काहीवेळ भितीचे वातावरण; अपघाग्रस्त टिमच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
। खोपोली । वार्ताहर ।
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रसायनाने भरलेल्या टँकरमधील रसायनची गळती मोठ्या प्रमाणात होत असल्याने काहीवेळ भितीचे वातावरण पसरलेले होते. अपघाग्रस्त टिमचे विजय भोसले आणि भक्ति साठेलकर यांच्यासह खोपोली पोलीस बोरघाट पोलीस व सर्व सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी पोहचली.केमिकल एक्सपर्ट धनंजय गिध आणि गुरूनाथ साठेलकर तातडीने पोहचल्यावर टँक्करची तपासणी केल्यावर गॅस किट ढिला असल्यामुळेच रसायन गळती झाले असल्याचे लक्षात येताच टँकरच्या चालकाला सर्व गॅस किट टाइट केलं तसेच पुढे अनुचित प्रकार घडू नये, यासाठी टँक्कर तेथेच थांबवून दुसर्या टँक्करमध्ये रसायन काढण्यात आले.