। खांब । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील धार्मिक तथा अध्यात्मिक क्षेत्रात नावाजलेल्या नडवली या गावी रविवारी (दि.6) रामनवमी निमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सुर्यकुलोत्पन्न मर्यादा पुरूषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांचे खांब विभागात नडवली येथे एकमेव मंदिर असल्याने येथे रामनवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची दरवर्षाची मोठी परंपरा आहे. त्याच अनुषंगाने रविवारी (दि.6) सकाळी 8 वा.श्रीं.ना अभिषेक पूजा, 10 ते 12 वा. रामजन्म उत्सव पुष्पवृष्टी, दुपारी 12 ते 12:30 वा.रविकांत वेदक यांची प्रवचनरूपी सेवा, दुपारी 2 ते 5 श्री सत्यनारायणाची महापूजा, 5 वा. ग्रामस्थ व महिला मंडळ नडवली यांचे सामुदायिक हरिपाठ, सायं. 7 ते 8 वा. देणगीदार व प्रमुख पाहुणे यांचा सन्मान सोहळा, 8 ते 9 वा. खांब येथील व्यापारी चेतन पुरणशेठ मोदी यांच्या सौजन्याने महाप्रसादी, तर रात्री 9 ते 11 वा. हभप भूषण महाराज वरखले यांची हरिकिर्तनरूपी सेवा त्यांनतर जागर भजन आदी धार्मिक तथा अध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. या कार्यक्रमांचे यशस्वीतेसाठी श्री.राम मित्र मंडळ नडवली, ग्रामस्थ व महिला मंडळ नडवली, शिवराय मित्र मंडळ मुंबई-ठाणे, उदय मित्र मंडळ व महिला बचत गट नडवली आदी मोलाचे सहकार्य करीत आहेत.