| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरात आक्षेपार्ह मजकूर शेअर केल्याप्रकरणी तळा पोलिसांकडून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोएब नौशाद खाचे, रा. वरचा मोहल्ला असे आरोपीचे नाव असून, त्याने मुघलसम्राट औरंगजेब याच्या फोटोसह आक्षेपार्ह मजकूर लिहून आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर प्रसिद्ध केले होते. ही पोस्ट बर्याच हिंदू तरुणांनी पाहिल्याने त्यांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला. यावेळी बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी ताबडतोब तळा पोलीस ठाणे गाठून धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी या आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांनी या तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करून जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी तसेच धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला तळा पोलीसांनी ताब्यात घेतले असून, घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गवई यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.