नागोठणे आयटीआयतर्फे विविध क्रीडा स्पर्धा उत्साहात

| नागोठणे | वार्ताहर |

नागोठणे आयटीआयतर्फे व्यक्तिमत्तव विकास वाढविण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते. यामध्ये क्रीडा स्पर्धेचे आयोजन करून सदरच्या क्रीडा स्पर्धा ह्या उत्साहामध्ये व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडल्या.

क्रीडा स्पर्धेमध्ये कब्बडी, खो-खो व क्रिकेट या सांघिक खेळाचे तर बुद्धिबळ, कॅरम, 100 मी व 200 मी धावणे या वयैक्तिक खेळाचे आयोजन करण्यात आले. कौशल्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये प्रशिक्षणार्थी यांना कौशल्य व रोजगार या विषयावर श्री जाधवर सर यांनी प्रशिक्षणार्थी यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच संस्थेच्या प्राचार्या श्रीमती प्रतिभा चव्हाण मॅडम यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले. संस्थेमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरणाचे आयोजन केले होते यामध्ये प्रशिक्षणार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेच्या प्राचार्य प्रतिभा चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमास जाधवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रशिक्षणार्थी यांनी आपल्यामधील विविध कलागुण या कार्यक्रमध्ये प्रदर्शित केले. सांस्कृतिक कार्यक्रमध्ये एकल नृत्य, ग्रुप डान्स, नाटिका, रॅम्प वॉक, फॅन्सी ड्रेस हे कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी पारितोषिक वितरण करण्यात आले. वितरणामध्ये संस्थेमध्ये घेण्यात आलेले क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमध्ये भाग घेतलेल्या प्रशिक्षणार्थी यांना उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.

विविध स्पर्धेचा निकाल
पुरुष कबड्डी-
प्रथम क्रमांक आय.एम.सी.पी. व्यवसाय, द्वितीय- वीजतंत्री व्यवसाय, तृतीय – तारतंत्री व्यवसाय
महिला कबड्डी- प्रथम – वीजतंत्री विभाग, द्वितीय- केमिकल विभाग, बेस्ट राईडर ऋषिकेश माथळ व बेस्ट डिफेन्डर रोशन काष्टे
खोखो मुले- प्रथम- आयएमसीपी व्यवसाय , द्वितीय – एओसीपी व्यवसाय , तृतीय- वीजतंत्री व्यवसाय
खोखो मुली- प्रथम- केमिकल विभाग, द्वितीय- वीजतंत्री विभाग, बेस्ट अंपायर मकरंद पाटील
क्रिकेट- प्रथम- एमएमसीपी व्यवसाय, द्वितीय- एम. एम. व्ही. व्यवसाय, तृतीय- तारतंत्री व्यवसाय. बेस्ट बॉलर योगेश राक्षिकर, बेस्ट बॅट्समन अमेय जोशी
100 मी धावणे मुली- प्रथम- तीर्था पाटील, द्वितीय- कविता डोरे
200 मी मुली- प्रथम- तीर्था पाटील, द्वितीय- सरिता शिद
कॅरम मुले- प्रथम- सुनील मचाळे व अभिषेक मोहिते, द्वितीय -प्रतीक वाघीलकर,हितेश पाटील
मुली प्रथम- बेबी शिद, द्वितीय – अंजली लेंडी
बुद्धिबळ मुले- प्रथम- भालचंद्र निरगुडा, द्वितीय- वेदांत पाटील
मुली प्रथम- बेबी शिद द्वितीय- अंजली लेंडी
एकल नृत्य- प्रथम- उत्तम, द्वितीय- तीर्था पाटील
ग्रुप डान्स- प्रथम- एमएमव्ही व्यवसाय, द्वितीय- वीजतंत्री व्यवसाय
नाटिका- प्रथम- एमएमव्ही व्यवसाय, द्वितीय- आयएमसीपी व्यवसाय
रॅम्प वॉक- प्रथम – मितेश शेळके
फॅन्सी ड्रेस- प्रथम रोशन पवार

Exit mobile version