वरसोली समुद्रकिनारी स्वच्छता अभियान

। सोगाव । वार्ताहर ।

8 जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील समुद्रकिनारी दी लाईफ फाऊंडेशन आणि पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती करत सर्व उपस्थितांसोबत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली. तसेच स्वच्छता मोहिमेसाठी समुद्रकिनारा आणि त्या सभोवतालचा परिसर स्वच्छ तसेच प्लास्टिक मुक्त करण्यात आला. यावेळी संकलित कचरा हा व्यवस्थितपणे वरसोली ग्रामपंचायतीच्या स्वच्छता विभागाच्या स्वाधीन करण्यात आला.

या समुद्र स्वच्छता कार्यक्रमात पीएनपी होली चाईल्ड सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका वेलैयमाल अलियास वेनी, उप-मुख्याध्यापिका सादाफ सबस्कर, सर्व शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी दी लाईफ फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक शिलानंद इंगळे व सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ, राखी राणे, आणि स्वयंसेवकांनी मेहनत घेतली.

Exit mobile version