। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त हर घर झेंडा या कार्यक्रमांतर्गत तहसीलदार कार्यालय, वारिसे क्लासेस माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग, फॉरेस्ट ऑफिस, महा सेना ग्रुप वरसोली ग्रामस्थ ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या संयुक्तविद्यमाने प्लास्टिक मुक्तवरसोली किनारा तसेच वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्लास्टिक मुक्तीची शपथ घेण्यात आली. या उपक्रमास क्लासेसचे आजी-माजी विद्यार्थ्यांनी चांगला सहभाग दर्शवत किनारा स्वच्छ करण्यात आला.

माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांनी आरोग्य व स्वच्छतेबद्दल मुलांना मार्गदर्शन केले. तसेच प्लास्टिकचा वापर कमी करण्याबद्दल देखील माहिती दिली व प्लास्टिक कचरा करणार नाही व लावलेल्या झाडांचे संगोपन उत्तम करण्याची शपथ देण्यात आली. महासेना ग्रुपनी प्लास्टिक गोळा करत जेसीबीच्या साह्याने आजूबाजूला पडलेले कचरा एका ठिकाणी करून ठेवले. गोळा झालेले प्लास्टिक पुनर्निर्मिती करीता पाठविण्यात आले व इतर कचरा गोळा करून घंटागाडी ने नेण्यात आले. या कार्यक्रमास अनेक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी वारीसे यांनी सर्वांचे आभार मानत असेच सामाजिक कार्य पुढे चालू राहावे असे आवाहन केले.