| अलिबाग | प्रतिनिधी |
ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी आणि सुरेश काका इलेव्हन वरसोली या संघात बुधवारी तिसरी उपउपांत्य फेरीची लढत झाली. यामध्ये इलेव्हन संघाने दमदार कामगारी बजावत विजय मिळवला. या स्पर्धेतील सामनावीर शिरू विक ठरला.
तिसरी उपउपांत्य फेरीची लढत ज्ञानी इलेव्हन नांगरवाडी आणि सुरेश काका इलेव्हन वरसोली या संघात झाली. सुरुवातीला वरसोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले.तर नांगरवाडी संघाने फलंदाजीला सुरुवात केली. सुरुवातीला तीन षटकात 20 धावा या संघाने केल्या होत्या. त्यानंतर या संघातील खेळाडूंनी जोरदार फटकेबाजी करीत सहा षटकात 70 धावा केल्या. वरसोली संघासमोर विजयासाठी 71 धावांचे लक्ष्य होते. या संघाने सुरुवातीपासूनच फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. या संघाने तीन षटकात 37 धावा केल्या. विजयासाठी उर्वरित तीन षटकात 33 धावांचे आव्हान या संघासमोर होते. वरसोली संघातील शिरू विकने फटकेबाजी करीत 14 चेडूंत 53 धावा करीत संघाला 76 धावा मिळवून दिल्या, आणि विजय आपल्याकडे खेचून हा सामना जिंकला. या स्पर्धेतील सामनावीर शिरू विक ठरला आहे. त्याला माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले.