जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत वायुसूत ओढांगी प्रथम

। पेण । वार्ताहर ।
रसायनी येथे विजय मुरकुटे यांच्या वाढदिवसानिमित्त रायगड जिल्हा कबड्डी असोशियनच्या मान्यतेने घेण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम चार संघामध्ये वायुसूत ओढांगी, शिवशंभो पाटणेश्‍वर, नवकिरण भेडखळ, झुंझार कणे यांनी मजल मारली. उपांत्य फेरीमध्ये वायुसूत ओढांगी विरुद्ध नवकिरण भेडखळ तर दुसर्‍या उपांत्य फेरीमध्ये शिवशंभो पाटणेश्‍वर विरुद्ध झुंझारकणे यामध्ये लढत झाली, तर अंतिम सामना हा वायुसूत ओढांगी विरुद्ध शिवशंभो पाटणेश्‍वर यांच्यामध्ये रंगला. अटीतटीच्या सामन्यात वायुसूत ओढांगीने बाजी मरत अंतिम विजेतेचा मान मिळविली. तर शिवशंभो पाटणेश्‍वर द्वितीय, निवकिरण भेडखळ तृतीय आणि झुंझारकणे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले. या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून विकी ठाकुर शिवशंभो पाटणेश्‍वर, सर्वोत्कृष्ट चढाई जितेश पाटील, वायुसूत ओढांगी सर्वोत्कृष्ट पक्कड अमित ठाकुर भेडखळ तर पब्लिक हिरो मंथन भोईर कणे यांना वैयक्तिक बक्षिसांनी गौरविण्यात आले.

Exit mobile version