ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ‌‘वेद’ची साथ

| महाड | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील विद्यार्थी शैक्षणिकरित्या सक्षम व्हावे यासाठी वेद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भेलोशी पंचक्रोशी माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळा येथे वेद प्रतिष्ठानचे संस्थापक, भेलोशी शाळेचे सहाय्यक शिक्षक स्वर्गीय मनोज नारायण गोडांबे यांच्या 46 व्या जन्मदिनानिमित्त वेद प्रतिष्ठान अध्यक्षा मधुरा मनोज गोडांबे यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

शिक्षक म्हणून सेवा बजावताना सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी स्वर्गीय मनोज गोडांबे यांनी 2021 साली वेद प्रतिष्ठानची स्थापना केली. ग्रामीण भागातील विद्यार्थी वर्गाचा सर्वांगीण विकास हेच या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट्य. परंतु, याच उद्दिष्ट्यपूर्तीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतानाच गोडांबे यांना 7 मे 2024 रोजी काळाने गाठलं. परंतु, या धक्क्यातून सावरत त्यांच्या पत्नी मधुरा गोडांबे यांनी ही सामाजिक बांधिलकीची ज्योत अखंडपणे तेवत ठेवण्याचा दृढनिश्चय केला. आणि स्वर्गीय मनोज गोडांबे यांचे कार्य, इच्छाशक्ती त्यांच्या पश्चातही अशा विविध सामाजिक उपक्रमांतून जिवंत ठेवली आहे.

दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी भेलोशी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इनायतखान देशमुख, सचिव नारायण गोडांबे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश राणे, शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बनसोडे, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भूषण ढगे, ज्येष्ठ ग्रामस्थ विठोबा रेवाळे, ह.भ.प. दगडू रेवाळे,आत्माराम शेंडल, महादेव धारशे, नथुराम बैकर, वेद प्रतिष्ठान अध्यक्षा मधुरा मनोज गोडांबे यांच्यासह वेद प्रतिष्ठान, मनोज दादा मित्र मंडळ सदस्य, शिक्षक यांच्यासह विद्यार्थी व पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. यादरम्यान निलेश गोडांबे, जितेंद्र रेवाळे, संतोष राणे, संदेश राणे, संतोष यादव, प्रतीक यादव, संदेश रेवाळे, शांताराम गोडांबे, अमित यादव, नंदू राणे, प्रसाद सकपाळ, अंकुश गोडांबे, राजेश गोडांबे, दिनेश गोडांबे, प्रणित पवार, प्रफुल्ल पवार, वेद गोडांबे, परी गोडांबे, विधी गोडांबे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली.

Exit mobile version