वेदांतची दैदिप्यमान कामगिरी

बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्ण

| पाली | वार्ताहर |

हरियाणा सोनिपत येथे (दि.6 व 7) झालेल्या नॅशनल बेंच प्रेस व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पालीतील वेदांत अमित गायकवाड (18) या युवकाने दैदिप्यमान कामगिरी केली आहे. वेदांतने बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्ण व डेड लिफ्ट पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे. वेदांतच्या या यशामुळे जिल्ह्यासह राज्याचे नावलौकिक झाले आहे.

वेदांत कोलाड येथील गीता. द. तटकरे या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहे. मागील अनेक दिवसांपासून तो या स्पर्धेसाठी तयारी व कठोर मेहनत करत आहे. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कडाक्याच्या थंडीत ही स्पर्धा खेळली व यश प्राप्त केले आहे. त्याला या स्पर्धेसाठी वडील अमित गायकवाड व भाऊ श्रेयश वाघमारे यांनी मार्गदर्शन केले.

Exit mobile version