वीर तायक्वॉन्डो अ‍कॅडमीचे घवघवीत यश

। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल खांदा कॉलनी येथील न्यु होरायझन पब्लिक स्कुल येथे रविवारी पार पडलेल्या रायगड डिस्ट्रिक्ट सब ज्युनिअर आणि कॅडेट तायक्वॉन्डो चॅम्पीयनशीप 2021-22 या स्पर्धेत वीर तायक्वॉन्डो अ‍कॅडमीने घवघवीत यश मिळवले.

या स्पर्धेत श्‍लोक गुंजल, स्वयम नाईक, वीर भोईर, मुस्तफा शेख, खंतेश वासकर, सेजल चौधरी, सारा बैयकर यांनी सुवर्णपदक पटकावले. आर्यन इचके, सारा बैयकर हे रौप्य पदकाचे मानकरी ठरले. तर, साची गायकवाड, सोनाक्षी दानावाले यांनी कांस्य पदक पटकावले.

वीर तायक्वॉन्डो अ‍कॅडमीचे अध्यक्ष हरेश्‍वर भगत यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी आणि राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. प्रशिक्षक संजय भोईर, हेमंत कोळी, संदीप भगत, प्रज्ञा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली वीर तायक्वॉन्डो अ‍ॅकॅडमीच्या खेळाडूंनी यश संपादन केले आहे.

Exit mobile version