चिल्हे येथे भाज्या व चित्रकला प्रदर्शन

। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ खांब संचलित श्रमिक विद्यालय चिल्हे येथील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या भाज्या व चित्रकला प्रदर्शन भरवून आपल्यातील कलाकौशल्यांचे सादरीकरण केले.
कोरोना महामारीमुळे सर्वच बाबतीत बंधने आली असतानाच रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा या पालक व स्थानिक प्रशासनाच्या संमतीनुसार व शासकीय कोरोना नियमानुसार यापूर्वीच सुरू करण्यात आल्या आहेत. तर विद्यार्थी श्रमिक विद्यालय चिल्हे येथील मुख्याध्यापक व सर्व शिक्षकवर्गानी वर्गाच्या सुप्त कलागुणांना वाव मिळविण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी चित्रकला प्रदर्शन व विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. विद्यार्थी वर्गानेही स्वत: चित्र रेखाटून व मिळेल ती भाजी आणून प्रदर्शनात सहभाग नोंदविला. या प्रदर्शनाचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक दीपक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी मोलाचे सहकार्य केले.

Exit mobile version