। मुंबई । वृत्तसंस्था ।
शेतीमालाच्या दरात सध्या घट होत असली तरी आता हिवाळ्याच्या तोंडावर भाजीपाल्याचे दर वाढतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शेतकर्यांनी वेळेचे योग्य नियोजन करून भाजीपाल्याची लागवड केली, तर उत्पन्नात भरघोस वाढ होणार आहे. कोरोना काळात भाजीपाल्यांना महत्व प्राप्त झाले होते. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने याकडे पाहिले जात होते. योग्य नियोजन केले तर 60 ते 70 दिवसामध्ये भरघोस उत्पन्न मिळू शकते.