दि. 29 व 30 ऑक्टोबर रोजी महावितरणच्या परिमंडल कार्यालयात होणार
| मुंबई | प्रतिनिधी ।
मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या निर्णयानुसार प्रसिध्द केलेल्या सुधारित निवड यादीमध्ये नव्याने निवड झालेल्या विद्युत सहाय्यक या संवर्गातील उमेदवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी परिमंडलनिहाय दि. 29 व 30 ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे.
महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या संवर्गाची रिक्त पदे भरण्याकरिता 3 वर्षांच्या निश्चित कालावधीकरिता कंत्राटी पध्दतीने उमेदवारांची निवड करण्यासाठी एप्रिल व जुलै 2019 मध्ये विद्युत सहाय्यक या पदांच्या भरतीबाबत जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. नव्याने निवड झालेल्या उमेवारांची तसेच प्रतिक्षा यादीवरील उमेदवारांची परिमंडलनिहाय यादी महावितरणच्या संकेतस्थळावर (www.mahadiscom.in) उपलब्ध करून देण्यात आली आहे.
परिमंडलनिहाय यादीमध्ये आपल्या नावासमोर भांडूप परिमंडल दर्शवलेल्या 181 उमेदवारांनी दि. 29 व 30 ऑक्टोबर रोजी ‘विद्युत’ 2रा मजला, एल.बी.एस मार्ग, भांडूप (प), मुंबई या कार्यालयांमध्ये आपल्या कागदपत्रांची पडताळणी स्वतः उपस्थित राहून करणे अनिवार्य आहे. काही अडचण व काही माहिती हवी असेल तर उप व्यवस्थापक (मा.सं) -8879622038 या क्रमांकावर संपर्क करावे. त्याचप्रमाणे, यादीवरील नावासमोर कल्याण परिमंडल दर्शवलेल्या 127 उमेदवारांनी ‘तेजश्री’, जहांगीर मैदान, कर्णिक रोड, कल्याण(प), संपर्क- वरिष्ठ व्यवस्थापक (मा सं)- 8879627022 येथे स्वतः उपस्थित राहून कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहावे. जे उमेदवार कागदपत्रे पडताळणीकरिता हजर राहणार नाहीत, अशा उमेदवारांची उमेदवारी रद्द समजली जाईल. मुख्य अभियंता, भांडूप परिमंडल श्री. धनंजय औंढेकर यांनी सर्व उमेदवारांना उपस्थित राहून आपल्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे आवाहन केले आहे.