| सुधागड | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील एक पोटलज खुर्द या लहानशा खेडेगावात 11 जुलै 1987 रोजी शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझे वडील चिंतामण हुले यांचा व्यवसाय शेती तर आई मोलमजुरी करत असत. तिला वाढवण्यासाठी तिच्या आजीचा मोठा हातभार होता. तिचे प्राथमिक शिक्षण आपल्या जन्म गावी पोटलज हिते झाले.ती अतिशय काटक असल्यामुळे तिला जंगलात जाऊन आंबे काढणे रानमेवा गोळा करणे,बैलगाडी हाकलने,विहिरीत पोहणे याची खूप आवड होती. कुटूंबाची परिस्थिती अतिशय बेताची म्हणून तिने पुढील शिक्षण पाली येथील मुलींच्या वसतिगृहात राहून 12 वी पर्यंत पूर्ण केले. तिला अभ्यासाबरोबर खेळाची देखील खूप आवड होती. शालेय स्पर्धेतून कबड्डी आणि खो खो खेळातून तालुका जिल्हा आणि राज्य स्तरीय खेळात आपली ओळख निर्माण केली.
महाराष्ट्र राज्य कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण झाली.ती अतिशय जिद्दी, धाडसी, हुशार असल्यामुळे बारावीला कला शाखेत तालुक्यात प्रथम आली. आपल्या कुटूंबाचे नावलौकिक केले.तिची कौटुंबिक परिस्थिती गरीब असल्यामुळे तिला रोजगारासाठी मुबंई जावे लागले. मात्र तिचे मन तिते रमेना तिला शिक्षणाचा ध्यास लागला होता. त्यावेळी तिला मोठा भाऊ सुधीर आणि बहीण गीता यांनी स्वतःची हौसमौज न करता आपल्या बहिणीला शिक्षणासाठी आर्थिक मदत केली. तसेच त्याच्या गावात रहाणारे शिक्षक संजय थळे यांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाने पुढील शिक्षणासाठी मदत झाली. तिच्यातील असणाऱ्या गुणवत्तेमुळे तिचा डीएडला माणगाव हिते नंबर लागला. दोन वर्षाचा डीएड अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर ती नागोठणे येथे कोकण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात सेवेत रुजू झाली. मात्र तिने आपले शिक्षण अविरत चालू ठेवले.
15 मे 2014 रोजी भूषण सुतार यांच्या बरोबर विवाह झाले. तिच्या कुटूंबात पती आणि एक मुलगा आणि मुलगी असा छोटे कुटूंब आहे त्यानंतर माझे उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यास माझ्या पतीने मोलाचे सहकार्य केले. लग्नानंतर मी एम ए शिक्षण, डीएसएम, बीएड अभ्यासक्रम पूर्ण करून माध्यमिक स्तरावर अध्यापन करण्याची संधी संस्थेनी उपलब्ध करून दिली. मी विद्यालयात अध्यापन करीत असताना मला विद्यालयाने जी जबाबदारी दिली ते आव्हान म्हणून स्वीकारून पूर्ण केली. मी ज्या परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले ती परिस्थिती बेताची होती मात्र आता तसे राहिली नाही काळ बद्दलला परिस्थिती बदलली मात्र नेहमी मी जाणीव ठेवूनच समाजात वावरत असते. माझा विद्यार्थी हा या देशाचा सुसंकृत नागरिक घडला पाहिजे हा माझी नेहमी प्रयत्न असतो. **
अष्टपैलू महिला व्यक्तिमत्त्व :भाविका सुतार
