ज्येष्ठ अभिनेते शेखर जोशी यांचे निधन

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मराठी तथा हिंदी चित्रपट तथा मालिकांमध्ये कलाकार म्हणून भूमिका पार पाडणारे रत्नागिरीतील जेष्ठ रंगकर्मीं अभिनेते शेखर जोशी यांचे बुधवार, दि.25 रोजी, सकाळी सात वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. दशक्रियासारख्या अनेक चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची मोहोर उमटवली असून रत्नागिरीतील विविध संस्थांमधून त्यांनी रंगभुमीची सेवा केली आहे. त्यांच्या एकाकी जाण्याने रंगभरंगभूमीने एक हाडाचा कलाकार गमावल्याची भावना स्थानिक रंगकर्मींमध्ये आहे.

Exit mobile version