| मुंबई | वृत्तसंस्था |
मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांनी वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 1980 आणि 90 काळात एकापेक्षा एक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत त्यांनी चाहत्यांचे मनोरंजन केले. पण त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. शनिवारी दुपारी 2 वाजता विजय कदम यांच्या पार्थिवावरअंधेरी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. विजय कदम हे गेल्या दीड वर्षापासून कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्यावर उपचार सुरु होते. विजय कदम यांचा पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.