ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन

। मुंबई । वार्ताहर ।
ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन झालं आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

‘अर्धांगी’, ‘धूमधडाका’, ‘दे दणादण’, ‘गडबड घोटाळा’, ‘सौभाग्यवती सरपंच’, ‘माहेरचा आहेर’ अशा अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची जोडी चांगलीच गाजली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. ‘थरकाप’ या चित्रपटांच्याही त्या निर्मित्या होत्या.

Exit mobile version