| मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांनी आपल्या सशक्त अभिनयाच्या जोरावर मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये एक खास स्थान निर्माण केले होते. विशेषतः दूरदर्शनवर गाजलेल्या ‘गजरा’ मालिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या आणि प्रचंड लोकप्रिय ठरल्या. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्या निधनाने चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. त्या 85 वर्षांच्या होत्या. दया डोंगरे यांनी त्यांच्या कारकीर्दीत अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या. ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘नकाब’, ‘लालची’ आणि ‘कुलदीपक’ यांसारख्या चित्रपटांत त्यांचा अभिनय पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे त्यांनी ‘चार दिवस सासूचे’ या लोकप्रिय मालिकेतही काम केले होते.






