उरणमध्ये डेंग्यू सदृश्य आजाराचा बळी

। उरण । वार्ताहर ।

वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील विजय नारायण पाटील (52) यांचा डेंग्यू सदृश्य आजाराने शनिवारी (दि.20) मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विजय पाटील यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

उरण तालुक्यातील बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील अनेक रहिवाशांना डेंग्यू या आजाराने ग्रासले होते. त्यातच वेश्वी ग्रामपंचायत हद्दीतील विजय पाटील यांचा डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. विजय पाटील हे वेश्वी गावातील माजी सरपंच विलास पाटील यांचे धाकटे बंधू आहेत. विजय पाटील यांच्या मृत्यूने वेश्वी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version