| अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अलिबागच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सर्वच्या सर्व 18 जागा जिंकून परिवर्तन पॅनलला पराभूत केले आहे. या निवडणुकीसाठी 26 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्यात आले होते. निवडणूकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद एकत्र होते. सहकार पॅनलला पराभूत करण्यासाठी इतर संघटनांनी एकत्र येऊन परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले. परंतू परिवर्तन पॅनलला पराभव पत्करावा लागला. सहकार पॅनलमध्ये पॅनल प्रमुख म्हणून राजेंद्र म्हात्रे, राजेश सुर्वे, नरेंद्र गुरव, विजय पवार, सुशील वाघमारे, उदय गायकवाड, भगवान घरत, अनंत ठाकूर यांच्यासह अनेक सभासद, कार्यकर्ते यांनी खूप मेहनत घेतली. विजयी उमेदवारांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.