पनवेलमध्ये महाविकास आघाडीचा विजय

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यात 17 ग्रामपंचायती करता रविवारी (दि.5) पार पडलेल्या निवडणुकीत शेकाप महाविकास आघाडीने वरचस्मा ठेवल्याचे दिसून आले आहे. या निवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.6) जाहीर झाला असून, शेकाप-महाविकास आघाडीने या निवडणुकीत बाजी मारल्याचे दिसून आले आहे. सोमवारी हाती आलेल्या निकाला नुसार तालुक्यातील 17 पैकी 9 जागेवर शेकाप-महाविकास आघाडीचे थेट सरपंच निवडून आले तर 7 जागेवर भाजप आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार थेट सरपंच निवडून आला आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार बाळाराम पाटील तर भाजपच्या वतीने प्रशांत ठाकुर यांनी या निवडणुकीची दुरा सांभाळली. ग्रामपंचायत निवडणुकीत 83 टक्के मतदान झाले होते. 17 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे विश्लेषण करायचे झाल्यास शेकाप-महाविकास आघाडीने भाजपाला मात दिली आहे. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने या निवडणुका महत्वाच्या मानल्या जात आहेत. 407 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 17 थेट सरपंच पदासाठी 47 उमेदवार उभे राहिले होते.

शेकाप-महाविकास आघाडीः दुंदरे- सुभाष भोपी, कोन- अश्विनी शिसवे, कसळखंड- संजय घरत, दापोली- निकिता समाधान घोपकर, वाघिवली- अनिल पाटील, गुळसुंदे- मिनाक्षी जगताप, तुराडे- रंजना गायकवाड, वावेघर- गितांजली गाथाडे, गिरवले- प्रताप चंद्रकांत हातमोडे.
भाजपाः ओवळे- रूपेश गायकवाड, विचुंबे- प्रमोद भिंगारकर, भिंगार- गुलाब वाघमारे, मालडुंगी- सिताराम चौधरी, सोमाटणे- तेजस्वी पाटील, न्हावे- जितेंद्र पाटील
गाव विकास आघाडीः चिखले- दिपाली तांडेल.
अपक्षः देवद- विनोद वाघमारे

Exit mobile version