सिराजची ‘विक्ट्री परेड’

| हैद्राबाद | वृत्तसंस्था |

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर मुंबईत भारतीय संघाची विजय परेड काढण्यात आली. यानंतर सर्व खेळाडू आपापल्या शहराकडे रवाना झाले. खेळाडू घरी पोहोचताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. हैदराबादमध्ये मोहम्मद सिराजसोबत पण असेच दृश्य पाहायला मिळाले. जिथे संपूर्ण हैदराबादने मोहम्मद सिराजचे जंगी स्वागत केले आणि सिराजची विजयी परेड काढली. आता या विजय परेडचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मोहम्मद सिराज रस्त्यावर चाहत्यांसोबत ‘लेहरा दो’ हे गाणं गाताना दिसत आहे. आकाशात तिरंगा फडकवत मोहम्मद सिराजसोबत हे गाणेही चाहते रिपीट करत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी फटाके फोडले जात होते.

Exit mobile version