लोकांमध्ये भितीचे वातावरण
| नेरळ । वार्ताहर ।
जानेवारी महिन्यात दर्शन झालेला रानगवा हा वन विभागाने ठाणे जिल्ह्यात हाकलून त्याचे संरक्षण केले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रानगवा दर्शनास पडला आहे. तालुक्यातील माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या नाण्याचा माळ येथे बुधवार (दि.15) सकाळी रानगवा दिसून आला आहे. दरम्यान, वन विभागाच्या माथेरान वन विभागाच्या पथकाने या रानगव्याल कोणी दुखापत करू नये यासाठी मागोवा कायम ठेवला होता.

माथेरानच्या पायथायशी असलेल्या नाण्याचा माळ आदिवासी वाडीत फिरत होता. डोंगरातील पाणी असलेल्या ठिकाणी सागाची वाडी येथील महिला जंगलातून जात असताना त्यांना रानगवा दिसला. तेथून हा रानगवा नाण्यामाळ आणि सागाचावाडी येथील वस्तीमध्ये गेला. स्थानिक आदिवासी लोकांनी माथेरानच्या पाथयाशी असेलेल्या आदिवासी वाड्यांमधील ग्रामस्थांमध्ये वातावरण निर्माण झाले. माथेरान वन विभागाचे अनेक कर्मचारी जुम्मापट्टी येथून बेकरे वाडी भागात पोहचले. त्यावेळी वन पाल एच एस म्हात्रे यांनी वन कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थांना भेटून रानगवा प्राण्याबद्दल माहिती देवून त्याला कोणतीही इजा करू नये अशी सूचना केल्या.