। कोलाड । वार्ताहर ।
देशपातळीवर बँक ऑफ इंडिया ही सार्वजनिक क्षेत्रातील मोठी बँक असून राज्यात तसेच जिल्हा स्तरावरील रायगड जिल्ह्याची अग्रणी असलेल्या बँक शाखेमार्फत ‘एकात्मतेच्या संस्कृतीद्वारे राष्ट्राची समृद्धी’ या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात 16 ऑगस्ट ते 15 नोव्हेंबर या कालावधीत दक्षता जागरूकता सप्ताह पाळला जात आहे. या अंतर्गत रायगड विभागातील येणार्या सर्व शाखांनी जिल्ह्यात विविध वेगवेगळ्या ठिकाणी 20 सप्टेंबर रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. याला संबधीत ग्राहकांकडून उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी झोनल मॅनेजर मुकेश कुमार व डेप्युटी झोनल मॅनेजर बिरेन चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनानुसार बँक ऑफ इंडिया रायगड झोनतर्फे विविध ग्रामीण व निमशहरी शाखांमध्ये विविध शाखांच्या शाखा व्यवस्थापकांनी ग्रामसभा आयोजित केल्या होत्या.