| मुंबई | प्रतिनिधी |
विजय बजरंग व्यायाम शाळा, विजय नवनाथ मंडळ यांनी मुंबई शहर कबड्डी असो. व गोलफादेवी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 14 वर्षांखालील मुलांच्या गटात तिसर्या फेरीत धडक दिली. मुलींच्या गटात गोलफादेवी प्रतिष्ठानने साखळीत दोन विजय मिळवीत अग्रस्थान गाठण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल टाकले. वरळी गावातील गोलफादेवी मंडळाच्या पटांगणावर सुरू असलेल्या मुलांच्या दुसर्या फेरीच्या सामन्यात विजय बजरंगने शताब्दी स्पोर्ट्सचा प्रतिकार 73-45 असा संपुष्टात आणला.
दुसर्या सामन्यात विजय नवनाथने ओम् ज्ञानदीपचा 81-32 असा सहज पराभव करीत तिसरी फेरी गाठली. मुलींच्या सामन्यात गोलफादेवी प्रतिष्ठानने चंद्रोदय मंडळाचा 55-30 असा पराभव करीत साखळीत सलग दुसर्या विजयाची नोंद केली. महर्षी दयानंद स्पोर्ट्सने शेवटच्या साखळी सामन्यात शिवशक्ती महिला संघाचा 50-39असा विजय मिळविला.