जिल्ह्यातील अन्य तिघांचा समावेश
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्य मच्छिमार सहकारी संघाच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील चौघेजण संचालक म्हणून निवडूण आलेले आहेत. यामध्ये विजय कृष्णा गिदी, अॅड. जे.टी.पाटील, मनोहर महादेव बैले आणि अर्पिता चंद्रकांत कोळी यांचा समावेश आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजय गिदी हे राखीव मतदार संघातून तर अर्पिता कोळी या महिला राखीव मतदार संघातून विजयी झालेल्या आहेत. मनोहर बैले हे रायगड जिल्हा मतदार संघातून तर जे.टी.पाटील हे संपूर्ण महाराष्ट्र सागरी सहकारी मतदार संघातून यापूर्वीच बिनविरोध विजयी झालेले आहेत. गिदी हे सलग तीन वेळा या संस्थेवर संचालक म्हणून विजयी झालेले आहेत. त्यांच्या या निवडीचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.