विजय, विकास अहिल्याबाई पुरस्काराने सन्मानित

| उरण । वार्ताहर ।
राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होलकर राष्ट्रीय पुरस्कार 2021 पुरस्काराने उरण तालुक्यातील विजय व विकास भोईर या बंधूंना राज्यपाल भगतसिंग कोशायरी यांच्याहस्ते सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्काराचे वितरण राज्यपाल भगतसिंग कोशायरीजी यांच्या हस्ते व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित राज्य भवनावर शनिवार दि. 16 एप्रिल रोजी करण्यात आले. या यशाबद्दल त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी हा सर्वोत्कृष्ट सन्मान आपला सर्वांचा असून ज्यांनी आम्हा दोघा भावंडांना उत्तुंग प्रेम केले त्यांचा आहे. हा सन्मान आम्हा दोघा बंधूंचा नसून आमच्या वरती प्रेम करणार्‍या प्रत्येक घटकाचा आहे. हा सन्मान समाजातील त्या प्रत्येक चांगल्या घटकांच्या चरणी समर्पित होवो ही श्रीचरणी प्रार्थना अशी भावनात्मक प्रतिक्रीया पुरस्कार स्वीकारल्यानंतर विजय व विकास बंधूनी व्यक्त केली.

Exit mobile version