पनवेल शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजय कादबाने

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकपदी विजय कादबाने यांनी बुधवारी (दि.1) पदभार स्वीकारला. पनवेल शहरचे मावळते वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना सहाय्यक पोलीस आयुक्तपदी पदोन्नती मिळाली असून अजयकुमार लांडगे यांनी विजय कादबाने यांना पनवेल शहर पोलीस ठाण्याचा बुधवारी पदभार सुपूर्द केला. यावेळी त्यांचे खारघर पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे, पनवेल तालुका पोलीस निरीक्षक (गुन्हे) अंकुश खेडकर, गुन्हे शाखा युनिट 3 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पवार, तळोजा वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक सुनील सावंत, मुंबई पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांच्यासह पोलीस अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आदींनी भेट घेऊन तसेच दूरध्वनीद्वारे विजय कादबाने यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Exit mobile version