विजय नवनाथ क्रीडा मंडळ कबड्डी स्पर्धा

शिवनेरी सेवा, सुनील स्पोर्टस् दुसर्‍या फेरीत दाखल

| मुंबई | प्रतिनिधी |

गुड मॉर्निंग स्पोर्टस् यंग प्रभादेवी क्रीडा, शिवनेरी सेवा, सुनील स्पोर्टस् यांनी विजय नवनाथ क्रीडा मंडळाने ‘अमृत महोत्सवी’ वर्षानिमित्त आयोजित केलेल्या पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात ‘लोकनेते स्व. दत्ताजी नलावडे’ सुवर्ण चषकासाठी सुरू असलेल्या दुसर्‍या दिवशी गुड मॉर्निंग स्पोर्टस्ने वीर संताजी क्रीडा मंडळाला 42-28 असे पराभूत केले. यंग प्रभादेवीने चुरशीच्या लढतीत जय दत्तगुरुला 30-29 असे चकविले. दुसर्‍या सत्रात जय दत्तगुरुच्या ऋतिक नागले, शुभम शिंगाडे यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात चुरस आणली. शिवनेरीने पिंपळेश्‍वर क्रीडा वर 40-20 अशी लीलया मात केली. जय भारत क्रीडा ने आदर्श क्रीडाला 46-20 असे पराभूत केले.

Exit mobile version