। पालघर । प्रतिनिधी ।
महाड तालुक्यात एमआयडीसी कंपनीत गॅस गळती झाल्याच्या घटनेला दोन दिवसही उलटले नसून आता पालघर जिल्ह्यातील बोईसर एमआयडीसीमधील कंपनीत स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीमधील केमिकल कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. स्फोटाचा आवाज आणि हादरे सुमारे 2 किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या स्फोटात आणखी काही कामगार जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
बोईसर तारापूर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल या लोखंडाचे उत्पादन घेणाऱ्या कारखान्यात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटमध्ये एक कामगार जखमी असल्याची माहिती समोर आली आहे . या घटनेमुळे कारखान्यातील कामगारांसह स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाल आहे. दरम्यान, बोईसर तारापूर एमआयडीसी अपघातांच सत्र वारंवार सुरूच असून यामुळे येथील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.







