| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चौल-सागमळा येथील शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते विजय वसंत ठाकूर यांचे बुधवारी (दि.28) निधन झाले. निधनसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन भाऊ, चार बहिणी, चार पुतणे, सात नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर चौल-सागमळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी चौल-सागमळा ग्रामस्थ, नातेवाईक, शेकापसह विविध पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांचा दशक्रिया विधी गुरवार, दि. 5 नोव्हेंबर रोजी 9 वाजता, तर तेरावे 7 नोव्हेंबर रोजी होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगण्यात आले.
विजय ठाकूर यांना देवज्ञा
