। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषद कर्मचारी पतपेढीच्या ऑनररी सेक्रेटरी विजया विजय पाटील या नियत वयोमानानुसार निवृत्त झाल्या. पतपेढीच्यावतीने आयोजित निरोप समारंभाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या चित्रा पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी रा.जि.प कर्मचारी पतपेढीचे अध्यक्ष महेंद्र भगत, समीर अधिकारी, राजेंद्र गायकवाड, अमिता पाटील-नेने. मंगेश पाटील, सुनिल पाटील, धनंजय पाटील, श्री. संकपाळ, सुनिल माळी, सचिन वावेकर, प्रथमेश घरत सर्व कर्मचारी वृद्ध उपस्थित होते.