| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पोयनाड ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तसेच आ. जयंत पाटील, पंडितशेठ पाटील, अॅड.राजन पाटील, मीनाक्षी पाटील, सुनंदा पाटील यांचे बंधु विजयकुमार मधूकर पाटील (वय 75) यांचे शुक्रवारी (दि.24) ह्रद्यविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पक्षाच्या जडणघडणीत,आंदोलनात त्यांचा मोठा सहभाग होता.
त्यांच्या अंत्ययात्रेला पोयनाड बाजारपेठेतील व्यापारी, पंचक्रोशीतील सर्व कार्यकर्ते तसेच कुटूंबिय प्रमोद पाटील, संजय पाटील, अॅड.आस्वाद पाटील, भावना पाटील, शैला पाटील, चित्रा पाटील, चित्रलेखा पाटील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी चंदा पाटील, भगिनी रत्नप्रभा पाटील, शोभना पाटील तसेच स्वप्निल, संकेत आणि सोनाली ही मुले. डॉ.कविसा, निकीता सुना नातवंड असा मोठा परीवार आहे. त्यांच्या निधनाने पोयनाड गावात (बाजारपेठेत) हळहळ व्यक्त करण्यात आली.