पुणे | प्रतिनिधी |
पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील विकास हरिदास पोखरकर हे कोलकत्ता येथून भारतीय लष्कर सेवेतून निवृत्त झाले.त्यानिमित्त कुटुंबीय आणि ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
पुणे रेल्वे स्थानकावर थोरले बंधू विजय पोखरकर यांनी पुष्पहार घालून स्वागत केले. मंचर येथील निवासस्थानी अ रहिवाश्यांनी व नातेवाईकांनी फुलांची सजावट करून त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला.यावेळी पत्नी सारिका पोखरकर यांच्यासह आई, वडील तसेच नातेवाईक व रहिवाश्यांनी विकास पोखरकर यांचे पुष्पहार, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन स्वागत केले. याप्रसंगी कोरोनाचे नियम पाळून छोटेखानी सत्कार सोहळा झाला,
या कार्यक्रमाचे प्रास्तविक भाषण बंधू विजय हरिदास पोखरकर यांनी केले तर मुलगा स्वरूप, मैत्री करंडे यांनी आपले वडील व काकांचे देशसेवेबद्दल कौतुक केले.मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे प्रसिद्धिप्रमुख मारुती विश्वासराव यांनीही गौरवपर भाषण केले.