| खांब | वार्ताहर |
रोहा तालुक्यातील तळवलीतर्फे अष्टमी या ग्राम पंचायतीमध्ये दाखल झालेल्या विकास रथाचे ग्राम पंचायतीच्या वतीने मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. विकसित भारत रथ विविध शासकीय योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडून या अभिनव उपक्रमाचे आयोजन संपूर्ण भारतभर करण्यात आले आहे. या विकास रथासोबत आलेल्या शासकीय अधिकारी वर्गाने शासनाच्या विविध प्रकारच्या लोकोपयोगी योजनांची माहिती देऊन प्रबोधन केले. यावेळी सरपंच रविंद्र मरवडे, उपसरपंच संदीप महाडिक, मा.उपसरपंच गजानन बामणे, सदस्य दयाराम मरवडे, हरिश्चंद्र मांगुळकर, कृषी सहायिका सारिका दिघे, केंद्र प्रमुख रत्नाकर कनोजे, सुरेश महाडिक, सुरेश मरवडे आदींसह ग्रा.पंचायत हद्दीतील ग्रामस्थ, महिला तसेच प्रा.शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, आशासेविका व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.