। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत शहरातील विकास त्रिभुवन यांचा बंगलोर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओ इकॉनोमिक डेव्हलपमेंट या संस्थेने राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित केले. कर्जत शहरातील रहिवासी असलेले विकास त्रिभुवन हे 1999 सालापासून पर्यावरण क्षेत्रात काम करतात. सदर पुरस्कार सोहळा हा बंगलोर येथे आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर काम करणार्या देशभरातून विविध क्षेत्रातील 40 जणांना सन्मानित करण्यात आले. बंगळूरु येथील ए.डी.ए. रंगमंदिर येथे संस्थेचे संस्थापक निवृत्त आय.ए. एस.अधिकारी आणि निती आयोगाचे सल्लागार डॉ.शिवप्पा पुट्टास्वामी (डेप्युटी चेअरमन कर्नाटक राज्य), उमाश्री (माजी मंत्री कर्नाटक राज्य) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मनीषा प्रधान (प्रदूषण नियंत्रण अधिकारी ठाणे महानगर पालिका, तसेच प्रभाकर गोतारणे, कर्जत नगरपरिषदचे माजी नगरसेवक दीपक मोरे, रविंद्र घाडे, कर्जत नगरपरिषदचे माजी स्वीकृत सदस्य अरविंद मोरे आदी उपस्थित होते.