। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील मुठवली खु.येथील स्मशानभूमी कामाकरिता आ.अनिकेत तटकरे यांच्या निधीतून 7 लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे. येथील गावातील पिढ्यान पिढ्यांची स्मशानभूमी तशाच पद्धतीची होती. तालुक्यातील गावागावात स्मशानभूमींची विकासकामे पुर्ण झाली आहेत. मात्र या स्मशानभूमीला कोणीही वाली नव्हता. मुठवली ग्रामस्थांनी स्मशानभूमी विकासकामाची कैफियत आ.अनिकेत तटकरे यांच्याकडे मांडली. तर आ.अनिकेत तटकरे यांनी क्षणाचाही विलंब न लावता 7 लाख रूपयाच्या निधीचे पत्र दिल्याने ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.