। कोल्हापूर । वृत्तसंस्था ।
ज्येष्ठ शिवकालीन शस्त्र संग्राहक गिरीश लक्ष्मण जाधव कालवश झाले आहेत. महाविद्यालयीन दशेपासूनच शस्त्र संग्रहाचा छंद लागला होता. त्यांनी राज्यभर फिरून शस्त्रांचा विपुल संग्रह केला होता. शिवकालीन शस्त्र हा त्यांच्या अभ्यासाचा विषय राहिला.
आजवर त्यांनी प्रयत्नसाध्य राहत शस्त्रसंग्रह वाढवला. मृत्युंजयकार शिवाजी सावंत यांचे आशीर्वाद त्यांना लाभले होते. पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, हैदराबाद अशा शहरांतील जुन्या-पुराण्या ठिकाणी शिवकालीन शस्त्रास्त्रांचा ते शोध घेत राहिले. त्यांची निष्ठा पाहून अनेकांनी शस्त्रे त्यांना भेट म्हणून दिली आहेत. संग्रह वाढवितानाच या शस्त्रास्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व, विविध संदर्भग्रंथांचे वाचन करुन त्यांनी सखोल अभ्यास केला होता.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती, सह्याद्री प्रतिष्ठान, लखुजीराजे जाधव प्रतिष्ठान, शाहिर परिषद यासह राज्य आणि देशपातळीवरील विविध संस्था-संघटना तसेच शासन व खासगी ट्रस्टची वस्तू संग्रहालये, पुरातत्व विभागाच्या विविध समित्यांवर ते तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून सक्रिय होते. व्यक्तीगत आणि कौटूंबीक आर्थीक गरजा बाजूला ठेवून त्यांनी गेल्या 50 वर्षांपासून त्यांनी इतिहाकालीन शस्त्रास संग्रह, त्यांचा अभ्यास आणि संशोधनाचे व्रत जोपासले होते.