| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीचे आदई पंचायत समिती गणातील उमेदवार विलास फडके यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांना मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे विलास फडके यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
शेकाप-महाविकास आघाडीचे उमेदवार विलास फडके यांनी घरोघरी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला असून गावभेटी घेतल्या जात आहेत. त्यांचा प्रचार वेगात सुरू असून येथील मतदार त्यांचे जल्लोषात स्वागत करत आहेत. तसेच, प्रचारादरम्यान गावातील अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न असेल, असे विलास फडके यांच्याकडून सांगण्यात आले. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्ष-महाविकास आघाडीने प्रचाराचा वेग वाढवला असून उमेदवारांना जनतेचा, नागरिकांचा, मतदारांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. विलास फडके यांना ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष आणि युवकांनी भरभरून आशीर्वाद दिले आहेत. प्रचारादरम्यान खटारा या निवडणूक चिन्हाच्या घोषणांनी संपूर्ण परिसरात दुमदुमून गेला.







