विलास तांडेल यांचे निधन

उरण | वार्ताहर |

नवघर गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास गजानन तांडेल यांचे सोमवार, दि. 14 नोव्हेंबर रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते 65 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नात असा परिवार आहे. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार, दि.23 नोव्हेंबर रोजी श्रीक्षेत्र माणकेश्‍वर (उरण) येथे सकाळी आठ वाजता, तर उत्तरकार्य विधी गुरुवार, दि.24 नोव्हेंबर रोजी राहत्या घरी नवघर येथे सकाळी 10 वा. होणार असल्याचे कुटुंबियांकडून सांगितले आहे.

Exit mobile version