| माणगाव | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेची विळे शाळा ही तब्बल 111 वर्ष जुनी शाळा आहे. विळे गाव हे माणगाव तालुक्यातील एक प्रकारे सीमेवरती वसलेले गाव असून विळे भागात एमआयडीसी नजीक आहे.
जिल्हा परिषद विळे मराठी शाळा इयत्ता चौथी पर्यंत असून शाळेच्या गुणवत्तेमुळे मोठ्या प्रमाणात येथे विद्यार्थ्यांचा कल शाळेमध्ये आहे. विळे मराठी शाळेत वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवले जातात. आणि त्यातूनच आज समाजामध्ये घडणार्या विविध घटनांमध्ये स्वतःचे संरक्षण, आत्मरक्षण करणे गरजेचे आहे. तसेच मुली आणि महिलांसाठी जागरूक असणे आणि सज्जक असणे हे गरजेचे आहे .आणि याचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे म्हणूनच अमर यादव सर यांनी आतोने येथे स्वतःची कराटे अकॅडमी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेतील शिक्षक दीपक ओव्हाळ व रवींद्र चांगण यांच्या विनंतीवरून अमर यादव यांनी विळे शाळेतील विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण देणे सुरू केले आहे. अनेक वेगवेगळ्या कराटे स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद विळे शाळेचे विद्यार्थी सहभागी होत असतात. नुकतेच एमडीएन स्कूल कोलाड येथे मोठ्या प्रमाणात जपान कराटे स्पर्धा झाल्या यामध्ये सुमिते कराटे या प्रकारात इयत्ता चौथीतील आरोही रवी चव्हाण हिने सिल्वर मेडल मिळवले तर काता कराटे मध्ये गोल्ड मेडल आणि सर्टिफिकेट मिळवले आहे, तसेच इयत्ता चौथीतील विवान विलास गोळे याने सुमिते कराटे मध्ये गोल्ड मेडल आणि प्रमाणपत्र मिळवले आहे. यामुळे शाळेसाठी अभिमानस्पद आहे, एवढ्या वरतीच न थांबता या विद्यार्थ्यांनी जपान कराटे असोसिएशन इंडियाच्यावतीने नुकत्याच विभागीय स्तरावरती सातारा जिल्हा येथे कराटे चॅम्पियन स्पर्धा घेण्यात आली. सातारा जिल्ह्यामध्ये छत्रपती शाहू महाराज शाहू स्टेडियम येथे या भव्य विभागीय कराटे चॅम्पियन स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांमध्ये सातारा नांदेड, पुणे कराड, धुळे ,रायगड येथील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धांमध्येही आरोही रवी चव्हाण इयत्ता चौथीतील जिल्हा परिषद विळे मराठी शाळेतील विद्यार्थिनीने मेडल मिळवले आहे, यामुळे मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांवरती आणि शाळेवरती अभिनंदनचा वर्षाव होत आहे, त्यांच्या यशामध्ये कराटे प्रशिक्षक अमर यादव सर तसेच जिल्हा परिषद विळे मराठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक ओवाळ सर, रविंद्र चांगण सर यांनी विशेष मेहनत घेतली आहे.