| खांब | वार्ताहर |
गावठी भाज्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना चांगला रोजगार मिळत असल्याने या भाज्यांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून जंगल भागात मिळणाऱ्या रानटी भाज्या सुरूवातीला मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येऊ लागल्या होत्या. तद्नंतर श्रावण महिन्यात गावागावात पिकविल्या जाणाऱ्या गावठी भाज्या तयार झाल्याने या भाज्या कोलाड परिसरात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये वांगी, मिरची भेंडी, शिराळा, घोसाळे, कारळे, काकडी, दुधी, भोपळा,माठ,आळूची पाने आदी भाज्यांचा समावेश आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने या भाज्यांना चांगली मागणी आहे. त्यामुळे भाजी विक्रेत्यांनाही चांगला रोजगार मिळत आहे.