। पनवेल । वार्ताहर ।
कामोठे वसाहत परिसरात गावठी बनावटीची पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी आलेल्या दोघाजणांना कामोठे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर त्यांचा तिसरा सहकारी हा अल्पवयीन मुलगा आहे. कामोठे वसाहती मधील जवाहर इंडस्ट्रीयल परिसरात काही व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती वपोनि स्मिता जाधव यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक त्या परिसरात टेहाळणी करत असतात एक संशयित रिक्षा त्या भागातून जात असताना दिसली. यावेळी सदर रिक्षा थांबवून रिक्षात बसेलले सराफुद्दीन आयुब शेख (26), ऋषिकेश गायकवाड (27) व सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता सराफुद्दीन यांच्याकडे देशी बनावटीची पिस्तूल, तर ऋषिकेश यांच्याकडे पाच जिवंत काडतुसे आढळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.