सार्वजनिक बांधकाम खात्याला सह्यांचे निवेदन, उपोषण,रस्ता रोकोचा इशारा
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील सर्वात खराब रस्ता म्हणून कळंब-पाषाणे-वांगणी या रस्त्याकडे पहिले जात आहे.या रस्त्यावरील अगणित खड्डे यामुळे रस्त्यावरून चालणारी एसटी गाडी परिवहन विभागाने बंद केली आहे.दरम्यान, ग्रामस्थ यांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती आणि आता त्या भागातील चार ग्रामपंचायत मधील 600 ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले. मात्र ग्रामस्थांनी रस्त्याबाबत आत शासनाने हालचाल न केल्यास धरणे आंदोलन आणि उपोषण आणि रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
कर्जत -मुरबाड राष्ट्रीय महामार्गाला कळंब येथून वांगणी रेल्वे स्थानक कडे जाणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून नादुरुस्त बनला आहे. या रस्त्यावरून सुरु असलेली एसटी गाडी कर्जत आगाराने रस्ता खड्डेमय झाल्याने बंद केली आहे.तर खराब रस्त्यामुले या भागातील असंख्य ग्रामस्थ हे पाठीच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यामुळे रस्त्याबद्दल शासनाने लक्ष द्यावे आणि रस्ता नव्याने करण्यात यावा यासाठी या रस्त्याचा प्रामुख्याने वापर करणार्या चार ग्रामपंचायतच्या ग्रामस्थांनी सह्यांची मोहीम हाती घेतली होती. ग्रामस्थांनी कळंब.साळोख,पाषाणे आणि पोशीर ग्रामपंचायत मध्ये सह्यांची मोहीम राबवून तब्बल 600 सह्या गोळा केल्या आहेत. त्या सह्यांचे निवेदन आज 16 डिसेंबर रोजी कर्जत येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आले.त्या निवेदनात या भागातील रहिवाशी यांनी कर्जत तालुक्यातील या खराब रस्त्यावरुन किमान आठ दिवस दररोज बांधकाम खात्याच्या अधिकार्यांनी जाऊन दाखवावे अशी विनंती करण्यात आली आहे. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन सुरु करणार असल्याचा इशारा दिला आहे.ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जतचे आमदार, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार तसेच बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिली आहेत.सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयात कळंब- पाषाणे-वांगणी रस्त्यावरून प्रवास करणारे रहिवाशी,वाहनचालक आणि प्रमुख स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सार्वराजकीय पक्षांनी मिळून आंदोलनं पुकारण्याचा निर्णय घेतला असून चार ग्रामपंचायत मधील सर्वपक्षीय कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन निवेदन दिले. त्यावेळी सचिन शेळके,सचिन म्हसकर,जनार्दन म्हसकर,रमेश शेळके,समीर वेहले,यतीन आगिवले, सुरेंद्र विषे, फाईक खान,प्रकाश फराट,अनिस बुबेरे,आवेश जुवारी,शहनवाज पानसरे,आदीं उपस्थित होते.





