| खोपोली | प्रतिनिधी |
खरीवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील करंबेळी गाळा लगत असणाऱ्या पोल्ट्रीतील विष्ठेच्या उग्र वासाने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. सदर पोल्ट्री बंद केली नाहीतर खालापूर तहसिल कार्यालयासमोर बुधवारी (दि.14) आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदन पत्र तहसिलदारांना दिले आहे.
खालापूर तालुक्यातील करंबेळी गावात गेल्या अनेक वर्षापासून पोल्ट्रीफार्म व्यवसाय सुरूवात आहे. पोल्ट्री गावालगतच असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेच्या उग्र वासाला ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आल्याने गावातील ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अखेर दाधी वाला, कावेश्वर महाडीक, मयुर महाडीक, भावना सुर्वे, प्रतिक्षा गायकर ग्रामस्थ आणि महिलांनी दुर्गधींला कंटाळून ग्रामपंचायत, खालापूर आरोग्य विभाग, खालापूर पंचायत समिती, पोलीस ठाणे, तहसिल कार्यालयात निवेदन दिले दिली. मात्र शासकीय स्तरावर निवेदनाची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत ग्रामस्थ हैराण झाले असून सदर पोल्ट्री बंद केली नाहीतर खालापूर तहसिल कार्यालयासमोर बुधवार दि.14 फेब्रुवारी रोजी आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
गावाशेजारीच पोल्ट्री असल्याने कोंबड्यांच्या विष्ठेवरी माशी संपर्ण गावात पसरल्या आहे. अंगणात काही वाळवण ठेवले असता माशांचा थवा बसत असल्यामुळे आमच्या आरोग्य धोकादायक आहे.
प्रतिक्षा गायकर
युवती ग्रामस्थ करंबेळी
मागील दहा वर्षापासून गावात पोल्ट्री फार्म आहे. यावरच माझ्या कुंटूबाचा उदरनिर्वाह होत आहे.पोल्ट्रीतील नेहमीच स्वच्छता ठेवत आहोत तरी ग्रामस्थांना दुर्गधीचा त्रास होत असेल तर यापुढे काळजी घेण्याचा प्रयत्न करेल.
आरती विचारे
पोल्ट्री मालक