। दिघी । प्रतिनिधी ।
देशभरात नावारूपाला आलेल्या दिवेआगर पर्यटनस्थळाला जोडणाऱ्या रस्त्याला कचऱ्यामुळे विद्रुपीकरण आले होते. प्रवेशद्वारातील कचरा समस्येने शहराला बकाल स्वरूप येण्याआधी दिवेआगरमधील गावकऱ्यांचे हात स्वच्छतेसाठी सरसावले आहेत. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर पर्यटन स्थळाला जोडणारे तीन रस्ते सुस्थितीत असून, प्रत्येक रस्त्याला खाडी, समुद्रकिनारा तसेच डोंगरदऱ्यांनी वेढले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांना एक वेगळच निसर्गरम्य वैशिष्ट्यपूर्ण प्रवास अनुभवता येत आहे. त्यामुळे अशा प्रसिद्ध पर्यटनाला नेहमीच रेलचेल दिसून येते. पर्यटकांचे स्वागत करणारे रस्ते व परिसर स्वच्छ असणे हे वैयक्तिक व सामूहिक दृष्टीने महत्वाचे आहे. समुद्रकिनारा व आसपासचा परिसर स्वच्छ करुन वेळोवेळी प्रत्यक्ष कृतीद्वारे स्वच्छतेचा संदेश दिला आहे. पर्यावरण पुरक भुमिका सदैव घेत असून, त्या नुसार आम्ही हा रस्ता स्वच्छ केला असल्याचं नागरिकांनी यावेळी सांगितले.
प्रवेशद्वार स्वच्छतेसाठी सरसावले हात
