| खोपोली | प्रतिनिधी ।
अखंड हरिनाम सप्ताह सारखे धार्मिक सोहळात ग्रामस्थांनी स्वच्छता अभियान सारखे सामाजिक उपक्रम राबवून जनजागृतीचा संदेश द्यावा असे आवाहन ज्येष्ठ कीर्तनकार महाराज पाटील यांनी केले. सुधागड तालुक्यातील गोंदाव या गावी मरिआई मंदिरात 21 ते 23 जानेवारी यादरम्यान अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. त्यात दिपोस्तव सोहळ्यात बोलत होते. यावेळी रमेश वाघमारे, नितीन वाघमारे, रवींद्र खंडागळे, जयवंत माडपे, यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान तीन दिवस सुरू असलेल्या अखंड हरिनाम सोहळ्याचे यांनी नेतृत्व केले,या सोहळ्यात महाराष्ट्रातील नामवंत प्रवचनकार व कीर्तनकार यांनी आपली सेवा सादर केली. हा सोळा यशस्वीतेसाठी अध्यक्ष काशिनाथ पाठारे, उपाध्यक्ष सचिन पाठारे, सचिव सुभाष पाठारे ,सहसचिव जयराम पाठारे ,खजिनदार निलेश पाठारे ,पंढरीनाथ तवले सह ग्रामस्थांनी विशेष प्रयत्न केले.