| पनवेल | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पामुळे चिंचपाडा, कोल्ही, कोपर, वाघीवली वाडा, वरचे ओवळे, कोंबडभूजे, तरघर, गणेशपुरी, आणि उलवे ही गावे विस्थापित झाली. पण त्यांच्या खरी ओळख जपण्याऐवजी सिडकोने त्यांना आर-1, आर-2, आर-3, आर-4, आर-5 अशी नवीन नावे दिली आणि गावांचा इतिहास व संस्कृती पुसून टाकली. या गावांना त्यांची जुनी ओळख कायम राहावी यासाठी दहा गाव समिती आणि भाजपचे समीर केणी यांनी पाठपुरावा केला होता. त्याला आ. महेश बालदी यांनी पाठबळ देऊन सिडकोने आता या गावांना जुनी ओळख कायम केली आहे.
सह व्यवस्थापकीय संचालक यांच्या अहवालानुसार बैठक घेण्यात आली होती. या निवेदनामध्ये त्यांनी आर. 1 आर.2. आर.3. आर 4, आर 5 क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे ग्रामस्थांच्या मागणीनुसार गावासंबंधित कागदपत्रावर नामांकनावर फलक उभारून देण्याबाबत विनंती केलेली होती. वरील नियोजनकार व मुख्य अभियंता नवी मुंबई यांना आर.1. आर.2. आर.3. आर 4. आर 5 क्षेत्रासाठी चिंचपाडा गावाचे कागदपत्रावर नामांकरण व फलक उभारून देण्याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना समीर केणी यांनी केली होती. याबाबत वडघर ग्रामपंचायतीने ठरावदेखील घेतला होता. आता मात्र सिडकोला दहा गाव समिती आणि भाजपचे पंचायत समिती अध्यक्ष समीर केणी यांनी झुकवले आहे. सिडकोने मागणी मान्य केली असून, या गावांना आता त्यांची जुनी ओळख कायम मिळणार आहे.
गावांना मिळणार जुनी ओळख

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606