श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांकडून नियमांचे उल्लंघन

। श्रीवर्धन । वार्ताहर ।
श्रीवर्धन येथील निसर्गरम्य समुद्रात पोहोण्यासाठी गेलेल्या पर्यटकांकडून समूद्रकिनार्‍या वरील बंधार्‍यावर बसवलेल्या नगरपरिषदेच्या सुचना फलकाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत सुर्यास्त झाल्यानंतर ही पर्यटक समुद्रात पोहण्याचा आनंद घेताना दिसतात.
शहरातून पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना समुद्रात पोहोण्यासाठी गेल्यावर पाण्याच्या भरती व ओहोटीचा अंदाज येत नाही. पोहोण्याच्या नादात पर्यटक लाटांशी खेळत पुढे जात असतात. खोल पाण्यात पोहत गेल्यावर पायाखालची वाळू सरकल्यास लाटांच्या तडाख्यात व्यक्ती पाण्यात खेचली जाते, यात एखादी दुर्घटना घडू शकते.सायंकाळी साडेसहा वाजता समुद्रात पोहोण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसाठी सुचना म्हणून भोंगा वाजवण्यात येतो. भोंग्याकडे दुर्लक्ष करत पर्यटक पाण्यात डुंबण्यात मग्न असतात.नगरपरिषदेचे कर्मचारी पोहोणार्‍या पर्यटकांना पाण्यातून बाहेर येण्यासाठी सुचना करत असतात, तेव्हाही पर्यटक कर्मचार्‍यांशी उद्धटपणाची वर्तणूक करताना दिसतात.

Exit mobile version